अब्दुल कादिर, सचिन आणि शोएब मलिक (Photo Credit: Instagram)

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचे महान लेगस्पिनर अब्दुल कादिर (Abdul Qadir) यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगाने शोक व्यक्त केला आहे. कादिर यांचे शुक्रवारी लाहोरमध्ये निधन झाले. ते 63 वर्षांचा होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम, विद्यमान कर्णधार सर्फराज अहमद, माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, सचिन तेंडुलकर, भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आणि आकाश चोप्रा यांनी कादिरच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. कादिर यांनी जगासमोर एका नवीन मार्गाने फिरकी गोलंदाजी सादर केली. कादिर हे पाकिस्तानमधील अनेक पिढ्या आणि जगभरातील लेग स्पिनर्ससाठी प्रेरणास्थान आहे. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्न आणि पाकिस्तानचा मुश्ताक अहमद यांचेही ते सल्लागार होते. शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहीर याला लेग स्पिनचे कौशल्यही त्यांनी शिकवले. (पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल कादिर यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन)

सचिनने अब्दुल कादिर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याच्याबरोबर त्यांच्याविरुद्ध खेळलेले सामन्यांचीच आठवण देखील त्यांनी काढली. भारतीय फिरकीपटू हरभजन म्हणाला की आपण एक चॅम्पियन गोलंदाज आहे तर लक्ष्मण म्हणाला की त्याच्या गोलंदाजीमुळे तो संमोहितअश्विन म्हणाला की तो एक फिरकी गोलंदाज अनुभवी आहे.

सचिन

हरभजन सिंह

लक्ष्मण

अश्विन

हर्षा भोगले

आकाश चोप्रा

मोहम्मद कैफ

मार्क रामप्रकाश पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज अक्रमने त्याला जादूगार म्हटले तर सध्याचा पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शहाने त्याला दिग्गज म्हटले. शादाब खानने त्याला लेगस्पिनर्स चा आयकॉन म्हटले, तर अख्तरने लेगस्पिनला पुन्हा जिवंत करण्याचे श्रेय कादिरला दिले. वॉर्नने त्याचे वर्णन जबरदस्त गोलंदाज म्हणून केले आहे.

शोएब अख्तर

वकार युनूस

शोएब मलिक

वसिम अक्रम

सर्फराज अहमद

मोहम्मद अमिर