अब्दुल कादिर (Photo Credits-Twitter)

पाकिस्तानी माजी महान लेग स्पिनर खेळाडू अब्दुल कादिर (Abdul Qadir) यांचे वयाच्या 63 व्या वर्षी कार्डियक अटॅकने निधन झाले आहे. 16 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या करिअरमध्ये अब्दुल कादिर यांनी 67 टेस्ट आणि 104 एकदिवशीय सामने खेळले आहेत. तर 5 एकदिवशीय सामन्यात त्यांनी पाकिस्ताच्या संघाचे कर्णधार पद सुद्धा भुषवले होते. त्यानंतर क्रिकेटमध्येच राहून कमेंटेटर झाले होते. तर 15 ऑगस्ट 1955 रोजी कादिर यांचा लाहौर येथे जन्म झाला होता.

अब्दुल कादिर यांची टॉप स्पिन खतरनाक असल्याने दिग्गज फलंदाजांना यांच्या समोर खेळताना घाबरायचे. असे सांगितले जाते की कादिर दोन प्रकारे गुगली फेकत गोलंदाजी करायचे. तसेच इमरान खान यांचा सुद्धा सहवास कादिर खान यांना लाभला होता. तसेच इमरान खान यांनी प्रोत्साहन केल्याने त्यांनी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली होती.

कादिर यांनी इंग्लंड संघाच्या विरोधात नेहमीच उत्तम खेळी केली होती. 1987 मध्ये पाकिस्तान मध्ये तीन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये त्यांनी 30 विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान लाहौर मध्ये कादिर यांनी 56 रन देत इंग्लंडच्या 9  फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या होत्या. तर 1983 आणि 1987  मध्ये अब्दुल कादिर यांनी दोन वेळा वर्ल्डकप खेळला होता.