Teacher Day 2019: सचिन तेंडुलकर यांनी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याबदल व्यक्त केली कृतज्ञता
Sachin Tendulkar And Ramakant Achrekar( Photo Credit: Twitter)

भारतात शिक्षकांच्या कौतुकासाठी विशेष दिवस म्हणून 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers'Day) साजरा केला जातो. या निम्मिताने भारताचा माजी खेळाडू 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनीही आपले गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांच्याबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सचिन यांनी आपल्या गुरुचे आभार मानले आहेत. दिवंगत रमाकांत आचरेकर यांनी दिलेल्या जीवनाचे धडे सचिन यांना नेहमी आठवणीत राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

"प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्यात कसे खेळायचे? हे देखील शिकवले आहे. शिक्षक केवळ शिक्षणच देत नाहीत तर शिष्यासाठी मोठे योगदान देत असतात. तसेच आचरेकर सरांनी सचिन यांच्या आयुष्यात मोठे योगदान दिले आहे. आजही आचरेकर सरांनी दिलेले धडे त्यांना मार्गदर्शन करत आहेत," असे बोलत सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर यांचे मनापासून आभार मानले आहेत

याआधी सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर यांच्या बदल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. आचरेकर हे निराळे शिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले होते. "आचरेकर सर जितके कडक स्वभावाचे होते, तेवढेच प्रेमळही होते. परंतु, त्यांचा हा प्रेमळ स्वभाव केवळ मैदानाबाहेरच पाहायला मिळत असे. मैदानात असताना त्यांना खेळा व्यतिरिक्त दुसरीकडे लक्ष गेलेले आवडत नसे," असे 'चला हवा येउ द्या' या मराठी कार्यक्रम दरम्यान सचिन बोलत होते. हे देखील वाचा-IPL 2020: विराट कोहलीचा आवडता खेळाडू होणार किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार, रविचंद्रन अश्विन याची होणार 'या' संघाबरोबर अदला-बदली

सचिन यांचे ट्विट-

सचिन तेंडुलकर यांनी उत्तम कामगिरी करुन भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. सचिन यांनी 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा आणि 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त भारतासाठी 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहे.