IPL 2020: विराट कोहलीचा आवडता खेळाडू होणार किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार, रविचंद्रन अश्विन याची होणार 'या' संघाबरोबर अदला-बदली
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: AP/PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू आणि आयपीएल (IPL) 2019 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) कर्णधार रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आगामी आयपीएल 2020 साठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात दाखल होऊ शकतो. 2018 च्या लिलावात 7.6 कोटींची प्रचंड रक्कम पंजाबशी निगडीत होती आणि त्यांचा कर्णधार अश्विन आता पुढच्या हंगामात नव्या टीमसह परत येऊ शकेल. मागील काही दिवसांपासून पंजाब संघ अश्विनला संघातून बाहेर काढण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, आता इएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तनुसार अश्विनला पंजाबने बाहेर केल्यास दिल्ली संघ त्याला खरेदी करण्यास उत्सुक आहे. दिल्लीपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या संघानेही अश्विनबद्दल आपली आवड दर्शविली होती, परंतु त्यानंतर काही कारणांमुळे ही गोष्ट पुढे जाऊ शकली नाही. (IPL 2020: माईक हेसन RCB क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक, सायमन कॅटिच हेड कोच)

मागील काही महिन्यांपासून दिल्ली आणि पंजाब या दोन्ही फ्रँचायझीमध्ये अश्विनबद्दल चर्चा रंगली होती आणि जर हा करार पक्का झाला आणि अश्विन दिल्लीच्या संघात गेला तर दिल्ली टीमला त्याचा मोठा फायदा होईल. दरम्यान, याबद्दल लवकरच घोषणा केली जाईल. आणि अश्विनने पंजाब संघ सोडल्यानंतर संघाचा नवीन कर्णधार कोण असेल याची देखील घोषणा केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबशी मागील काही वर्षापासून संबंधित असलेला आणि विराट कोहलीचा आवडता खेळाडू केएल राहुल (KL Rahul) याला पंजाब संघाचे कर्णधार पद सोपवले जाईल.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील दिल्ली संघ अश्विनला खरेदी करू शकेल. अश्विनच्या अगोदरही दिल्लीकडे फिरकीपटूंची लांबलचक रंग लागली आहे. त्यांच्याकडे अक्षर पटेल, अमित मिश्रा, राहुल तेवतिया, मयंक मार्कंडेय, सुचित आणि संदीप लामचेनेसारखे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. शिवाय, जर अश्विन पंजाब संघातून बाहेर पडत दिल्ली किंवा कोणत्याही फ्रेंचायझीमध्ये गेला तर आयपीएलच्या इतिहासातील तो त्याचे चौथा संघ असेल.