इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 12 व्या सत्रापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघाने न्यूझीलंड आणि किंग्ज इलेव्हन पंजाब सांघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson) यांना त्यांच्या संघाचे क्रिकेट संचालक (आरसीबी क्रिकेट डायरेक्टर) म्हणून नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमन कॅटिच (Simon Katich) यांना मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) यांना त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली बेंगळुरू संघाने मागील वर्षी आयपीएलमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली होती. ज्यामुळे ते पॉइंट्स टेबलच्या सर्वात खाली 8 व्या क्रमांकावर राहिले होते. गळुरूने 14 पैकी 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. सुरुवातीला बंगळुरूने सलग 5 सामने गमावले होते, ज्यामुळे नंतर त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य होते. यायचं कारणांमुळे पुढील हंगामापूर्वी बंगळुरूने त्याच्या संघ व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे.
दरम्यान, हेसन हे मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक होते. आणि नुकताच त्यांनी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी रवी शास्त्री यांना कडवी झुंज दिली होती. दुसरीकडे, कॅचिटने दोन वेळा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.