युवराज सिंह-रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

गुरुवार, 30 एप्रिल रोजी रोहित शर्मा 33 वा वाढदिवस साजरा केला. कर्णधार विराट कोहलीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी तो एक आहे. त्याच्या वाढदिवशी, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे प्रेम आणि कौतुक दाखवून शुभेच्छा दिल्या. आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या त्याच्या सहकाऱ्यांनीहीशुभेच्छा देत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या फ्रेंचायझीने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यात टीमच्या खेळाडूंनी रोहित संघ आणि त्यांच्यासाठी काय अभिप्रेत आहे हे सांगितले. यात युवराज सिंह, मिशेल मैक्ग्लाशन, किरोन पोलार्ड, आणि हर्शल गिब्स यांचा समावेश आहे. शुभेच्छा पाहून रोहित थक्क झाला आणि आपल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण त्याने युवराजला टॅग करण्याची संधी सोडली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणाला की कोरोना व्हायरस लॉकडाउनने त्याच्या केसांवर परिणाम केला आहे. (Lockdown: रवींद्र जडेजा याने लॉकडाउन मोडणाऱ्यांना व्हिडिओ पोस्ट करून दिली चेतावणी, पाहा आणि रनआऊट होण्यापासून स्वतःचा बचाव करा)

व्हिडिओमध्ये, युवीने विस्कटलेल्या केसांवर हेडबँड घातला होता. रोहितने लिहिले, “धन्यवाद मित्रांनो. युवराज लॉकडाउनने तुमच्या केसांवर गंभीरपणे परिणाम झाला आहे.” कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या भारत 3 मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे.

युवराजच्या हेअरकट वर रोहितची प्रतिक्रिया:

लॉकडाउनमध्ये रोहित सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. नुकताच रोहितने युवराजशी लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. दोघांनी कोरोना व्हायरससह वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या संबंधित क्रिकेट कारकीर्दीवरही प्रतिबिंबित केले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने मुंबईला चार विजेतेपद मिळवून दिले आहेत. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 15, 17,19 असे चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहेत. अलीकडेच गौतम गंभीरला म्हणला की, रोहितमध्ये निवृत्ती घेण्यापूर्वी आणखी काही आयपीएल विजेतेपद मिळवण्याची क्षमता आहे.