Rohit, Suryakumar, Yashasvi And Shivam (Photo Credit - X)

Maharashtra Government to Honor: गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दुसरीकडे रोहित शर्माने (Rohit Sharma) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबतची भेट संस्मरणीय असल्याचे सांगितले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आला आहे.

मिळणार 'इतके' कोटी रुपये  

टीम इंडियातील खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

टीम इंडिया बार्बाडोसहून सकाळीच दिल्लीला पोहोचले

'बेरील' नावाच्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया अनेक दिवस बार्बाडोसमध्ये अडकली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघ आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. 16 तासांच्या प्रवासानंतर भारतीय संघ अखेर गुरुवारी सकाळी दिल्लीच्या विमानतळावर उतरला. त्यानंतर संघाची मौर्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत नाश्ता केला. पंतप्रधान मोदींसोबत सर्व खेळाडूंचे फोटोशूटही झाले.