Rohit Sharma च्या मुलीची पहिली झलक (Photo)
Rohit Sharma and Ritika Sajdeh (Photo Credits: Twitter)

भारताचा तगडा फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्या परीचे आगमन झाले. 30 डिसेंबरला रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदवार्ता समजताच रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन ताबडतोब मायदेशी परतला. आपल्या गोंडस मुलीची पहिली झलक रोहितने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

हा फोटो अत्यंत क्युट, भावूक आहे. आपल्या इवल्या इवल्या हातांनी या मुलीने रोहित आणि रितिकाचे बोट पकडले आहे.

 

View this post on Instagram

 

‪Well hello world! Let’s all have a great 2019 ‬

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

 

रोहित शर्मा 13 डिसेंबर 2015 मध्ये रितिका सजदेवसोबत विवाहबद्ध झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांच्या घरी गोंडस मुलीच्या रुपात आनंद आला आहे.

12 जानेवारीपासून सिडनीत सुरु होणाऱ्या वन इंटरनॅशनल सिरीजमध्ये (ODI) खेळण्यासाठी रोहित 8 जानेवारीला सिडनीला रवाना होईल.