चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार Rohit Shamra; मुलीला पाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतला
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला मुकणार आहे. कारण आजच रोहित शर्मा याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने (Ritika Sajdeh) गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी तो मुंबईला रवाना झाला आहे.

12 जानेवारीपासून सिडनीत सुरु होणाऱ्या वन इंटरनॅशनल सिरीजमध्ये (ODI) खेळण्यासाठी रोहित 8 जानेवारीला सिडनीला रवाना होईल. कसोटी सामन्यात रोहीतच्या जागी इतर कोणालाही संघात अद्याप स्थान देण्यात आलेले नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रोहित शर्मा कसोटी सामन्यातही चांगली कामगिरी करत होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने 63 धावांची नाबाद खेळी केली होती.