Rohit Sharma झाला बाबा; चिमुकल्या परीचे आगमन
Rohit Sharma and Ritika Sajdeh (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने (Ritika Sajdeh) गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी ट्विटरवरुन देण्यात आली. मात्र रोहित आणि रितिकाकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.

त्याचबरोबर ही गोड बातमी रितिका सजदेवची बहिण आणि सोहेल खानची (Sohail Khan) पत्नी सिमा खानने (Seema Sachdeh Khan) सोशल मीडिया पोस्ट करुन दिली.

रोहित शर्मा 13 डिसेंबर 2015 मध्ये रितिका सजदेवसोबत विवाहबद्ध झाला. त्यानंतर तीन वर्षानंतर त्यांच्या घरी गोंडस मुलीच्या रुपात आनंद आला आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला रोहित शर्मा कसोटी सामन्यातही चांगली कामगिरी करत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने 63 धावांची नाबाद खेळी केली होती.