![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/rohit-sharma-72-.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, त्यातील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जात आहे. टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
The flick first and then the loft! 🤩
Captain Rohit Sharma gets going in Cuttack in style! 💥
Follow The Match ▶️ https://t.co/NReW1eEQtF#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/uC6uYhRXZ4
— BCCI (@BCCI) February 9, 2025
रोहित शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडला
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने स्फोटक सुरुवात केली वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd ODI 2025: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माने रचला इतिहास, कर्णधार म्हणून केला 'हा' मोठा पराक्रम)
Indian skipper Rohit Sharma surpasses Chris Gayle and is now only behind Shahid Afridi for the record of most sixes in ODI history 🇮🇳🔥#India #ODIs #RohitSharma #Sportskeeda pic.twitter.com/O1tmpacRp4
— Sportskeeda (@Sportskeeda) February 9, 2025
शाहिद आफ्रिदी पहिल्या स्थानावर
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये 351 षटकार मारले आहेत. आता रोहित या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. हे वृत्त लिहिण्यापर्यंत रोहितने एकूण षटकार मारले होते. रोहितने ख्रिस गेलला मागे टाकले. गेलने सामन्यांमध्ये 331 षटकार मारले आहेत. महेंद्रसिंग धोनी यादीत पाचव्या स्थानावर आहे. धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्येषटकार मारले आहेत.