इंग्लंडचा वेगवान गोलंदाज (England Pacer) ऑली रॉबिनसनला (Ollie Robinson) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान जुना वादग्रस्त ट्विट व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले होते. 30 जून रोजी झालेल्या सुनावणीनंतर ईसीबीच्या तीन सदस्यांच्या शिस्त आयोगाने त्यांच्यावर आठ सामन्यांसाठी बंदी घातली होती. ऑली रॉबिन्सन आता पुन्हा आपल्या करिअरची सुरुवात करू शकतो. रॉबिन्सन भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसू शकतो.
ईसीबीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन सामने निलंबनात जोडले आहेत. यात एक कसोटी आणि 2 टी-20 सामन्याचा समावेश आहे. रॉबिनसनची पाच सामन्यांची बंदी पुढील दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. ईसीबीने त्यांच्यावर सुमारे 3,29 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. भारत आणि इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत जर त्याला इंग्लंड संघात स्थान मिळाले तर तो भारताविरुद्ध खेळू शकतो. प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनने पुढच्या दोन वर्ष रॉबिन्सनला सोशल मीडियाचा वापर आणि भेदभाव विरोधी या दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शिफारस आयोगाने केली आहे. हे देखील वाचा-ENG(W) Vs IND(W) 3rd ODI: इंग्लंडने मालिका जिंकली! अखेरच्या सामन्यात मिताली राजची धमाकेदार खेळी, भारताचा 4 विकेट्सने विजय
रॉबिनसनवर 2012 आणि 2013 मध्ये ट्विटरवर अश्लील आणि वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप होता. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी 8 वर्षानंतर माफी मागितली. त्यांनी असे म्हटले होते की अशा कृत्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास अत्यंत लाजिरवाणे आहे. आयुष्याची वाट अत्यंत बिकट काळातून जात असताना त्यांनी हे ट्विट केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, इंग्लंडकडून पदार्पण करताना रॉबिनसनने किवी संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सात गडी बाद केले. यासह, जेव्हा फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्याने पहिल्या डावात 42 धावा केल्या होत्या. हा कसोटी सामना अनिर्णित ठरला होता.