ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (AUS Vs IND) यांच्यात शनिवारपासून (26 डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावून दाखवली आहे. दरम्यान, 50 षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. रिषभ पंत माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचा वारसा पुढे चालवेल का? हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. यातच रिषभने सामन्या दरम्यान भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनला दिलेल्या सल्लानंतर सर्वांनाच धोनीची आठवण झाली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात मॅथ्यू वेड 13 व्या षटकात फलंदाजी करत होता. तर, अश्विन गोलंदाजी करत होता. याच षटकात चौथ्या चेंडूवर वेडने अश्विनला चौकार ठोकला. त्यावेळी पंत अश्विनला सांगत होता की ‘चेंडू आतच ठेव, हा नक्की मारेल’. रिषभ पंतने दिलेल्या सल्ल्यानुसार, अश्विनने चेंडू टाकला. या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वेड आऊट झाला. रविंद्र जडेजाने त्याचा शानदार झेल घेतला. हे देखील वाचा- IND vs AUS 2nd Boxing Day Test: ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन Out की Not Out? थर्ड अंपायरच्या निर्णयावरून झाला वाद, तुम्हीच पहा
व्हिडिओ-
Translation: Keep it inside(stumps), he will try to hit!
And the next ball Wade hits in the air!
Rishabh Pant 🔥 https://t.co/rXGfRaXu07 pic.twitter.com/Sdm1im19Id
— Varchie (@Naniricci45) December 26, 2020
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रिषभ पंतची व्हिडिओमागील बडबडी ऐकायला मिळत आहे. धोनी ज्याप्रमाणे विकेटमागे असताना असताना फलंदाजाचे इरादे गोलंदाजाला सांगत दिसायचा. तसेच पंतही अशाच गोष्टी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना महेंद्र सिंह धोनीची आठवण झाली आहे.