टिम पेनचे रवादग्रस्त नआऊट (Photo Credits: Twitter)

IND vs AUS 2nd Boxing Day Test: भारताविरुद्ध (India) दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) पहिल्या दिवशी थर्ड अंपायरने ऑस्ट्रेलियन (Australia) कर्णधार टिम पेनच्या (Tim Paine) बाजूने दिलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक माऱ्याच्या जोरावर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला. मार्नस लाबूशेन आणि ट्रॅविस हेड यांनी वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. लाबूशेनने 48 तर हेडने 38 धावा केल्या. शिवाय, अ‍ॅडिलेड सामन्यातील सामनावीर ठरलेल्या कांगारू कर्णधार पेन देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि फक्त 13 धावा करून माघारी परतला. मात्र, तो यापूर्वीच बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला असता जर थर्ड अंपायरने भारताच्या रनआऊटची अपील मान्य केली असती. (IND vs AUS 2nd Boxing Day Test: मोहम्मद सिराजच दणक्यात पदार्पण, गोलंदाजाच्या प्रति कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 'या' जेश्चरने जिंकली यूजर्सची मनं)

55व्या ओव्हर दरम्यान कर्णधार पेन आणि ग्रीन यांच्यात एक धाव घेताना गोंधळ निर्माण झाला. उमेश यादव संधीचा फायदा घेत पेनच्या दिशेने थ्रो केला आणि विकेटकीपर रिषभ पंतने धावबाद करण्यासाठी स्टम्प उडवले. थर्ड अंपायरच्या पाहणीमध्ये पेनची बॅट ही क्रिजच्या पुढे गेल्याचं कोणत्याही कॅमेरा अँगलमधून दिसत नव्हतं तरीही अंपायर पॉल विल्सन यांनी पेनला नॉटआऊट दिलं. थर्ड अंपायरचा हा निर्णय सध्या वादग्रस्त ठरत आहे ज्यावर वसीम जाफर, शेन वॉर्न आणि अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

टिम पेनचे रनआऊट

वसीम जाफर

चुकीचा निर्णय !!

दरोडा!!

शेन वॉर्न आश्चर्यचकित!!

दरम्यान, गोलंदाजांच्या प्रभावी आक्रमणानंतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या दिवसाखेर सावध सुरुवात केली. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गुडघे टेकले आणि संघ 195 धावांपर्यंतच मजल मारू शकला. बुमराहने सर्वाधिक 4 विकेट काढल्या तर अश्विन 3, सिराज 2 आणि जडेजाला अखेरची 1 विकेट मिळाली. दिवसाअखेरीस नवोदीत शुबमन गिल नाबाद 28 तर चेतेश्वर पुजारा नाबाद 7 धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात अजुनही 159 धावांची आघाडी आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या कसोटी सामन्यातही शून्यावर माघारी परतला.