ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd टेस्ट, एमसीजी (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसर्‍या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्यात भारताकडून मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या भारतीय कसोटी संघात मिलेल्या संधीच सोनं करत सिराजने दणक्यात पदार्पण केलं आणि कांगारू संघाच्या दोन धडाकेबाज फलंदाजांना माघारी धाडलं. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टेस्ट सामन्यात सिराजने पहिले मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) सहपदार्पणवीर शुभमन गिलकडे कॅच आऊट करत माघारी धाडलं. शुभमन गिल भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण करणारा 297 वा खेळाडू, तर सिराज 298 वा भारतीय खेळाडू ठरला. यासह, सिराजच्या पहिल्या कसोटी विकेटनंतर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) गोलंदाजाच्या प्रति एका जेश्चरचे सोशल मीडियाद्वारे कौतुक होत आहे. (IND vs AUS 2nd Test Day 1 Stumps: MCG मध्ये शुभमन गिलची आक्रामक सुरवात, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 159 धावांनी पिछाडीवर)

चहाच्या वेळेसाठी सामना थांबविण्यात आला आणि भारतीय खेळाडू मैदानाबाहेर जात असताना कर्णधार रहाणेने पदार्पणात विकेट घेणार्‍या सिराजला नेतृत्व करू देत त्याला प्रथम पॅव्हिलियन जाण्याचा मार्ग दिला. रहाणेच्या या वागण्याने क्रिकेट चाहत्यांचीच मने जिंकली नाही तर क्रिकेट तज्ञही रहाणेचे खूप कौतुक करीत आहेत. चहाच्या ब्रेकनंतर सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा सिराजने कॅमरून ग्रीनला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि त्याची दुसरी टेस्ट विकेट मिळवली. कॅमरून ग्रीन 12 धावा करुन सिराजचा बळी ठरला तर 48 धावा करून लाबूशेन सिराजच्या चेंडूवर शुभमन गिलकडे झेलबाद झाला. पाहा रहाणेच्या जेश्चरवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

असाधारण जेश्चर

2018 आणि 2020

सिराजने ड्रेसिंग रूमकडे केले टीमचे नेतृत्व

पदार्पणवीर 

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 195 धावांवर गुंडाळल्यावर मेलबर्नमध्ये पहिल्या दिवसाअखेर भारताने 1 विकेट गमावून 36 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक फलंदाजी केली आणि नाबाद 28 धावा व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 7 धावा करून खेळत आहेत तरभारताकडून मयंक अग्रवाल भोपळाही न फोडता माघारी परतला. मिचेल स्टार्कने मयंकला बाद करत पहिले यश मिळवून दिले.