RCB vs KXIP, IPL 2019: सामना जिंकल्यावर विराट कोहलीने सेलिब्रेशन करताच आर.अश्विन भडकला (Video)
Virat Kohli and R. Ashwin (Photo Credits-twitter/Prince Singh)

RCB vs KXIP: बुधावारी (24 एप्रिल) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना खेळवण्यात आला. त्यावेळी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) पंजाब संघ सामन्यात विजयी झाला. त्यानंतर विराट ह्याने सामना जिंकल्याचा आनंद साजरा केला खरा, पण विरुद्ध संघाचा कर्णधार आर. अश्विन (R. Ashwin) मात्र भडकलेला दिसून आला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आर. अश्विन फलंदाजी करण्यासाठी आाला. त्यावेळी पहिल्या चेंडूत त्याने षटकार मारला. तसेच दुसऱ्या चेंडूतही त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानाच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने त्याची विकेट घेत अश्विनकडे पाहत हाताने काही खुणा केल्या. यावरुन अश्विन संतापला आणि मैदानातून बाहेरत जाताना त्याने त्याचे ग्लोव्ज फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.(RCB vs KXIP, IPL 2019: डिव्हिलियर्स याने एकहाती मारलेला जबरदस्त षटकार थेट स्टेडियमबाहेर Watch Video)

तर काल झालेल्या विराट कोहलीच्या संघाला धक्कासुद्धा बसला असून त्यांचा डेल स्टेन हा वेगवान गोलंदाज आयपीएलला मुकणार आहे. कारण स्टेन ह्याला दुखापत झाल्याने त्याला आयपीएलचे पुढील सामने खेळता येणार नाही.