RCB vs KXIP, IPL 2019: डिव्हिलियर्स याने एकहाती मारलेला जबरदस्त षटकार थेट स्टेडियमबाहेर (Watch Video)
AB-De-Villiers (Photo Credits: File Photo)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 12 व्या सीजनमधील 42 वा सामना काल (24 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात बंगलोरच्या (Bengaluru) के एम. चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium) मध्ये रंगला. या सामन्यात बंगलोर संघाने पंजाब संघावर 17 धावांनी विजय मिळवला. बंगलोर संघाच्या विजयात दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स  (AB de Villiers) याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. डिव्हिलियर्सने 44 चेंडूत सात षटकार आणि तीन चौकार मारत 82 धावा केल्या. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा (Man of the Match) किताब देखील देण्यात आला.

यातील एका षटकाराची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे. हा षटकार डिव्हिलियर्सने एका हाताने मारला आणि चेंडू चक्क स्टेडियम बाहेर गेला. याचा जबरदस्त षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे.

पहा व्हिडिओ...

किंग्स इलेवन पंजाब संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर टॉस हरलेल्या बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट गमावत 203 धावांचे लक्ष्य पंजाब संघासमोर ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब संघाने सात विकेट्स गमावत 185

धावा केल्या. लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब संघाचा 17 धावांनी पराभव झाला. किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)

आतापर्यंत झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघ 11 पैकी 5 सामने जिंकत 10 पाईंट्सच्या आधारे 5 व्या स्थानावर आहे. तर बंगलोर संघाने 11 पैकी 4 सामने जिंकत 8 पाईंट्स मिळत स्पर्धेत 7 व्या स्थानावर आहे.