RCB (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025  (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला गेला. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई 20 षटकात 8 गडी गमावून 146 धावा करु शकली. (हे देखील वाचा: RCB vs CSK: नजर हटी दुर्घटना घटी! विजेच्या वेगाने एमएस धोनीने सॉल्टला केले स्टंपिंग, पाहा व्हिडिओ)

पाटीदारचे अर्धशतक तर नूर अहमदने घेतल्या तीन विकेट

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बगंळुरुने 20 षटकात 7 गडी गमावून चेन्नईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बगंळुरुकडूनन कर्णधार रजत पाटीदारने 51 धावांची शानदार खेळी केली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 31 तर फिलिप सॉल्ट 32 धावांचे योगदान दिले. तर शेवटी येवून टिम डेव्हिडने 8 चेंडून 22 धावांची स्फोटक खेळी केली. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून नुर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

जोश हेझलवूडने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाचे तीन फलंदाज केवळ 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत सात गडी गमावल्यानंतर केवळ 146 धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्रने 41 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, रचिन रवींद्रने 31 चेंडूत पाच चौकार मारले. रचिन रवींद्र व्यतिरिक्त, एमएस धोनीने नाबाद 30 धावा केल्या. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड व्यतिरिक्त यश दयाल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.