U19 World Cup 2020: पाकिस्तानी फलंदाज 'मंकडींग' ने आऊट झाल्यावर ICC कडे नियम काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या जेम्स अँडरसन ची अश्विनने अशी घेतली फिरकी
जेम्स अँडरसन, रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI/IANS)

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणार्‍या अंडर-19 विश्वचषकात (World Cup) रोमांचक सामने खेळले जात आहेत. शुक्रवारी झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात अफगाणिस्तानचा (Afghanistan) गोलंदाज नूर अहमदने पाकिस्तानच्या (Pakistan) मोहम्मद हुरैराला 'मंकड' पद्धतीने धावबाद करून पॅव्हिलिअनमध्ये पाठवले. यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने आयसीसीला हा नियम रद्द करण्याचे आवाहन केले. तर अँडरसनच्या या आवाहनावर भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूर अहमदने वादग्रस्त 'मंकड' स्टाईलमध्ये पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद हुरैराला बाद केले. पाकिस्तान धावांचा पाठलाग करत असताना ही घटना 28 व्या ओव्हरमध्ये घडली. हुरैरा क्रीजवर उपस्थित होता.

जेव्हा नूरने पाचवा बॉल टाकला तेव्हा तो क्रीजमधून बाहेर पडला, त्यानंतर गोलंदाजाने त्याला 'मंकड'द्वारे आऊट केले. याच्या प्रत्युत्तरात शनिवारी अश्विनने क्रिकेटमधून 'मंकडींग' नियम काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या अँडरसनची टिंगल केली. अँडरसनने लिहिले,"आयसीसी आपण हा (मंकडींग) नियम काढू शकतो का?" अँडरसनच्या या ट्विटला उत्तर देताना अश्विनने लिहिले, "हा नियम काढून टाकण्यासाठी काहींच्या विचारांची गरज असू शकते !! आत्तासाठी, एखादा शॅडर युक्ती करू शकता." पाहा अँडरसन आणि अश्विनचे ट्विटरवरील हे संभाषण:

अँडरसन

अश्विन

दरम्यान, आयपीएल 2019 मध्ये अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलर याला याच पद्धतीने बाद केले होते. ज्यानंतर 'मंकड' रनआऊट बर्‍याच वादात सापडला होता. अश्विनने अ‍ॅन्डरसनला 'मंकड' नियम श्रेडर नियमात घालण्याचा सल्ला दिला. अंडर-19 विश्वचषकमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सामन्यादरम्यान फलंदाज या पद्धतीने बाद झाल्याच्या व्हिडिओवर अँडरसनने ट्विट केले होते.