मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) वेगवान गोलंदाज रवि यादव (Ravi Yadav) सोमवारी प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. आगरा येथील विविधा सनरायझ क्रिकेट अकादमीचा डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज रविने मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) पदार्पण केले. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात यादवने उत्तर प्रदेशच्या तीन खेळाडूंना पॅव्हिलिअनचा मार्ग दाखविला. पहिल्या षटकातील तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलवर रविने समीर रिझवी, अंकित राजपूत आणि आर्यन जुयाल यांना आपला शिकार बनवले. रवी असे करणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज बनला. यूपीचा कर्णधार अंकित राजपूतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाची निवड केल्यानंतर मध्य प्रदेश संघ पहिल्या डावात 230 धावांच्या माफक धावसंख्येवर ऑलआऊट झाला. मध्य प्रदेशच्या फलंदाजांची सामन्यात कधीच नियंत्रण नव्हते आणि अवघ्या 82 धावांवर अर्धा संघ गमावल्यानंतर 230 पर्यंत पोचण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. (Ranji Trophy: उत्तर प्रदेशविरुद्ध पहिले तिहेरी शतक करत मुंबईचा सरफराज खान 'या' एलिट यादीमध्ये झाला सामिल)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करून यादवच्या या कामगिरीचा व्हिडिओ शेअर केला. रवीने सलामी फलंदाज जुयालला त्याच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 13 धावांवर विकेटकीपर अजय रोहेराकडे झेलबाद केले. यूपीचा कर्णधार राजपूत आणि रिझवीला शेवटच्या दोन चेंडूंत बाद करून यादवने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने सामन्यात 61 धावा देऊन पाच गडी बाद केले. रविच्या या कामगिरीमुळे मध्य प्रदेशच्या संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 14 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविण्यात यश आले. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 230 धावा केल्या होत्या.
ICYMI: A hat-trick to remember! 👏👏👏
First First-Class Match ✅
First Over ✅
First Hat-trick ✅
Watch Madhya Pradesh’s Ravi Yadav’s special hat-trick against Uttar Pradesh
Follow the #MPvUP game live 👇👇 https://t.co/VOeMfWfYhd#RanjiTrophy @paytm pic.twitter.com/i6dTGJtMhk
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 28, 2020
रवी यादवच्या आधी 1939-40 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रथम श्रेणी सामन्यात रिस फिलिपने हॅटट्रिक घेतली होती. यूपीने एक विजय आणि पाच ड्रॉसह एकूण 14 गुण मिळवून गुणांची नोंद करत गुणतालिकेत चांगले स्थान मिळवले आहे. चार अनिर्णित आणि एक सामन्यात पराभवाचा सामना करत मध्य प्रदेश पाच सामन्यात आठ गुणांसह 17 व्या स्थानावर आहेत.