Ranji Trophy: रणजी क्वार्टर फाइनल फेरीसाठी 8 संघ निश्चित; कोणत्या टीम येणार आमने-सामने, जाणून घ्या
रणजी ट्रॉफी (Photo Credit: Twitter/BCCIdomestic)

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) च्या ग्रुप स्टेजच्या आठ संघांच्या नऊ फेऱ्यानंतर आठ संघांनी क्वार्टर फाइनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. गतविजेता विदर्भ आणि मुंबई, दिल्ली, पंजाबसारखे संघ अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्यास अपयशी ठरले आहेत. उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी पाच दिवसाचा खेळ व्हावा म्हणून एक अतिरिक्त दिवस देण्यात आला आहे. 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आठ संघांनी- गुजरात (Gujarat), बंगाल, कर्नाटक (Karnataka), सौराष्ट्र, आंध्र, जम्मू आणि काश्मीर (Jammu-Kashmir), ओडिशा आणि गोवा यांनी स्थान मिळवले आहे. या संघांपैकी केवळ ओडिशाला नवव्या फेरीच्या अंतिम दिवसापर्यंत स्थान निश्चित करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. क्वार्टर फायनल सामने सरदार पटेल स्टेडियम, वलसाड; डीआरईएमएस मैदान, कटक; सरकार गांधी स्मारक विज्ञान महाविद्यालय मैदान, जम्मू; आणि सीएसआर शर्मा कॉलेज मैदान, ओंगोले या स्टेडियममध्ये खेळवले जातील. मात्र, सध्याच्या वृत्तानुसार कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरची उपांत्यपूर्व फेरी बेंगळुरूला हलवला जाऊ शकतो. (Ranji Trophy: अरुणाचलच्या राहुल दलाल ने रणजी ट्रॉफीमध्ये केल्या दुसर्‍या सर्वाधिक धावा, व्हीव्हीएस लक्ष्मण चा रेकॉड अजूनही अबाधित)

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला याबाबत पत्र लिहिले आहे. या स्पर्धेतील नियमांनुसार कर्नाटकने दोन्ही संघांमधील शेवटचा सामना आयोजित केला असल्याने जम्मू-काश्मीरला हा सामना होस्ट करण्याची संधी मिळाली पाहिजे. परंतु कर्नाटकने परिस्थितीचा संदर्भ देत खेळण्याचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. मात्र, जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनने (जेकेसीए ) ही बोर्डाला हा सामना जम्मूच्या बाहेर न हलविण्याची विनंती केली होती. जम्मू-काश्मीरने सहा हंगामांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठल्यावर सामनाघरच्या मैदानावर खेळता येईल की नाही याबद्दल फारशी स्पष्टता नव्हती. पण, रविवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सामना जम्मूमध्ये होण्याची पुष्टी केली.

क्वार्टरफाइनल लाइन-अप

गुजरात विरुद्ध गोवा - सरदार पटेल स्टेडियम, वलसाड

बंगाल विरुद्ध ओडिशा - डीआरआयइएमएस मैदान, कटक

सौराष्ट्र विरुद्ध आंध्र - सीएसआर शर्मा कॉलेज ग्राउंड, ओंगोल

कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर - सरकार गांधी मेमोरियल सायन्स कॉलेज मैदान, जम्मू.