
Punjab Kings vs Rajasthan Royal: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium, Mullanpur, Chandigarh) येथे खेळवला जात आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
For the first time in the IPL, a team has to chase a 200+ total in Mullanpur 🎯https://t.co/IvwL3fRIi7 #PBKSvRR #IPL2025 pic.twitter.com/DjsIAENbXQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 5, 2025
यशस्वी जयस्वालची 67 धावांची शानदार खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने 20 षटकात 3 गडी गमावून 205 धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 67 धावांची शानदार खेळी केली. त्याने 45 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्याशिवाय रियान परागने 43 तर कर्णधार संजू सॅमसनने 38 धावांचे योगदान दिले. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी 206 धावा करायच्या आहेत.
लॉकी फर्ग्युसनने घेतल्या दोन विकेट
दुसरीकडे, लॉकी फर्ग्युसनने पंजाब किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पंजाब किंग्ज संघाकडून गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 2 गडी बाद केले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग आणि मार्को जॅनसेन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.