RR vs PBKS (Photo Credit - X)

Punjab Kings vs Rajasthan Royal: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium, Mullanpur, Chandigarh) येथे खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने पंजाबचा 50 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 155 धावा करु शकला.

यशस्वी जयस्वालची 67 धावांची शानदार खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने 20 षटकात 3 गडी गमावून 205 धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 67 धावांची शानदार खेळी केली. त्याने 45 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्याशिवाय रियान परागने 43 तर कर्णधार संजू सॅमसनने 38 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, पंजाब किंग्ज संघाकडून गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 2 गडी बाद केले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग आणि मार्को जॅनसेन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

जोफ्रा आर्चरची घातक गोलंदाजी

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 155 धावा करता आल्या. पंजाब किंग्जकडून नेहल वधेराने सर्वाधिक 60 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने 41 चेंडूत चाक चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, ग्लेन मॅक्सवेलने 30 धावा केल्या. त्याच वेळी,  राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. संदीप शर्मा आणि महेश थेक्षानाने प्रत्येकी दोन विकेट घेतली.