IND vs WI 4th T20: श्रेयस अय्यरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह, पुढील सामन्यात 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs WI) टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत चौथा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाच्या नजरा सीरिजवर कब्जा करण्यावर असतील. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) भारतीय संघासाठी पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याला चौथ्या टी-20 सामन्यात बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. त्याच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळू शकते. श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याची बॅट बराच काळ शांत आहे. तो धावा काढण्यासाठी धडपडत आहे. श्रेयस अय्यर शॉट बॉलवर आपली विकेट गमावत आहे. अशा परिस्थितीत तो प्रतिस्पर्धी संघाचा सहज बळी ठरला असून तो टीम इंडियासाठी मोठा ओझे बनला आहे. अशा स्थितीत चौथ्या टी-20 सामन्यात त्याच्या जागी इशान किशन किंवा संजू सॅमसनला संधी मिळू शकते.

संघासाठी ठरतोया का डोकेदुखी?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नव्हते. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात त्याने 10 धावांची खेळी केली, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात त्याने 24 धावा केल्या आहेत. अय्यरचा खराब फॉर्म कायम राहिल्यास त्याला आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकातून बाहेर बसावे लागू शकते. (हे देखील वाचा: Virat Kohli: विराटने का सोडले टीम इंडियाचे नेतृत्व? बोर्डाच्या 'या' अधिकाऱ्याने दिले स्पष्टीकरण)

'या' खेळाडूंना मिळू शकते संधी

सुपरस्टार फलंदाज इशान किशन आणि संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये धावा करत आहे. तरीही, या खेळाडूनां वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले नाही. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीसाठी इशान किशन मोठा दावेदार होता, तर संजू सॅमसन ही मधल्या फळी साठी उत्तम फलदांजी करतो. दरम्यान रोहितने सूर्यकुमार दोन सामन्यात यादवला सलामीची संधी दिली. तर ईशान किशनला सलामीचा प्रचंड अनुभव होता. आता अय्यरच्या फ्लॉपनंतर कर्णधार रोहित इशान किशनला किंवा संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर संधी देऊ शकतो.