Virat Kohli: विराटने का सोडले टीम इंडियाचे नेतृत्व? बोर्डाच्या 'या' अधिकाऱ्याने दिले स्पष्टीकरण
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खूपच खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर त्याने टी-20 फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले होते. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्याकडून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद काढून घेतले आणि दोन्ही फॉरमॅटची कमान रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवली. इथून भारतीय बोर्ड कोहलीशी चांगले वागत नसल्याच्या बातम्या चाहत्यांमध्ये पसरू लागल्या. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्यानंतर याला बळकटी मिळाली. यावेळीही रोहितला कमांड देण्यात आली.

दरम्यान, आता या सर्व मुद्द्यावर भारतीय मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या बाबतीत खुलासा केला आहेत. ते म्हणाले हे सगळ चुकीचे आहेत. कोहलीने स्वतः कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर केला. निवडीच्या सर्व बाबी निवडकर्त्यांद्वारे देखील पाहिल्या जातात. त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

कोहलीचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान

अरुण धुमल यांनी क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखती दरम्यान सांगितले की, विराट कोहली सामान्य खेळाडू नाही. त्यांनी भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान मोठे आणि सर्वोत्तम आहे. विराटने लवकरात लवकर फॉर्ममध्ये यावे अशी आमची इच्छा आहे. जोपर्यंत संघ निवडीचा प्रश्न आहे, तो आम्ही निवडकर्त्यांवर सोडला आहे. कोणाला वगळायचे हे त्यांनीच ठरवायचे आहे. (हे देखील वाचा: Mohammed Shami च्या T20 वर लागणार ब्रेक? निवडकर्त्यांचे फर्मान - तुम्ही खेळणार फक्त एकदिवसीय आणि कसोटी)

'कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय कोहलीचा होता'

ते म्हणाले, 'जो पर्यत कर्णधारपदाचा प्रश्न आहे, त्यातही कोहलीचा निर्णय होता. त्यांनीच ठरवलं होतं की आता मला कर्णधार राहायच नाही. विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडावे, असे कुणाला वाटत असेल, हे त्यांचे मत आहे. पण इथे कोहलीला कर्णधारपद सोडायचे होते. तो पूर्णपणे त्याचा निर्णय होता. आम्ही त्याचा आदर केला. त्यांचे क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. क्रिकेट बोर्ड त्याचा आदर करतो. आम्हाला कोहलीला मैदानावर अॅक्शन करताना पाहायचे आहे.