Shreyas Iyer (Photo Credit- X)

CSK vs PBKS 49th Match: आयपीएल 2025 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. चेपॉकवरील चेन्नईचा हा सलग पाचवा पराभव आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: Kuldeep Yadav Slaps Rinku Singh: सामना संपताच कुलदीपनं रिंकूच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं होतं? वाचा)

युजवेंद्र चहलने घेतली हॅट्रिक

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत 190 धावा करून सर्वबाद झाला. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार युवा अष्टपैलू सॅम करनने 88 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, सॅम करनने 47 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. सॅम करन व्यतिरिक्त, धोकादायक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने 32 धावा केल्या. दुसरीकडे, पंजाब किंग्जकडून स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात युजवेंद्र चहलने हॅट्रिक घेतली. युजवेंद्र चहल व्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

कर्णधार श्रेयस अय्यरची 72 धावांची दमदार खेळी

त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने 19.4 षटकांत फक्त सहा विकेट गमावून लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 72 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने 41 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त प्रभसिमरन सिंगने 54 धावांचे महत्वपुर्ण योगदान दिले. त्याच वेळी, पंजाब किंग्जकडून मथीशा पाथिराणाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.