
Kuldeep Yadav Slaps Rinku Singh: मंगळवारी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोमांचक विजय (KKR Beat DC) मिळवला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या या 48 व्या सामन्यात केकेआरने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर मैदानावर असे दृश्य दिसले की ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. दिल्लीचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) सलग दोनदा कानाखाली मारली, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. आता यानंतर केकेआरनेच इंस्टा पोस्ट पोस्ट करून हे गुपित उघड केले आहे.
कुलदीपने त्याला मस्करीत कानाखाली मारली
Yo kuldeep watch it pic.twitter.com/z2gp4PK3OY
— irate lobster🦞 (@rajadityax) April 29, 2025
खरंतर, सामना संपल्यानंतर दिल्ली आणि केकेआरचे काही खेळाडू मैदानावर बोलत होते. दरम्यान, कुलदीप यादवने गंमतीने रिंकू सिंगला थप्पड मारली. अर्थात ही थप्पड मस्करीत मारली गेली होती, पण रिंकू सिंगचा चेहरा पडला. यानंतर कुलदीपने त्याला पुन्हा कानाखाली मारली आणि रिंकू सिंग चिडला. (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Points Table Update: दिल्ली कॅपिटल्स पराभव करुन कोलकाताने प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल)
View this post on Instagram
केकेआरने व्हिडिओमागील सत्य सांगितले
कुलदीप यादवने रिंकू सिंगला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर, केकेआरने या दोघांची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली आणि ती एक विनोद असल्याचे उघड केले. उत्तर प्रदेशचे कुलदीप यादव आणि रिंकू हे खूप जवळचे मित्र आहेत. मित्रांमध्ये अशा प्रकारची थट्टामस्करी सुरूच असते. यासोबतच, या स्टोरीमध्ये दोघांचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले आहेत, ज्यावरून स्पष्ट होते की दोघांमध्ये चांगले संबध आहे.