DC vs KKR TATA IPL 2025 48th Match: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 190 धावा करु शकला. या दमदार विजयासह कोलकाताने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर अपडेटेड पॉइंट टेबल बद्दल बोलायचे झाले तर कोलकाता नाईट रायडर्स 9 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर दिल्ली 12 गुणांसह चोथ्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)