PSL 2021: Karachi Kings संघाने DRS गमावल्यावर अंपायर Aleem Dar यांनी केलं सेलिब्रेशन, एकदा पहाच हा व्हिडिओ
अंपायर अलीम दार (Photo Credit: Twitter)

इमाद वसीमच्या नेतृत्वातील कराची किंग्जने घेतलेला DRS आढावा थर्ड अंपायरने लुलटवून लावल्यावर मैदानावरील अंपायर अलीम दार आपला उत्साह दाखवण्याचा मोह आवरू शकले नाही. इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्स यांच्यातील पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. शेवटच्या ओव्हरमध्ये इस्लामाबाद संघाला विजयासाठी एका धावेची गरज होती, त्यावेळी गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज आसिफ अलीच्या बॅटला लागून मग पायाला लागला आणि फलंदाजांची विजयी धाव घेतली. गोलंदाजी संघाने अपील करत DRSची मागणी केली पण, रिव्यूमध्येही चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे, थर्ड अंपायरने फलंदाजाला नाबाद ठरवलं. मैदानावरील अंपायर अलीम दार यांनी त्यावेळी फलंदाजाला नाबाद ठरवलं होतं, त्यामुळे थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर त्यांनी आपण बरोबर असल्याचं दाखवून देत सेलिब्रेशन केलं.

दरम्यान, गतविजेत्या कराची किंग्जचा या स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले तर, इस्लामाबाद युनायटेड संघाने पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला. पहिले फलंदाजी करताना कराची किंग्जने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 196 धावांची मजल मारली. शरजील खानने या धावसंख्येचा मोठे योगदान देत 59 चेंडूत 105 धावांची खेळी केली. खानचा साथीदार आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने निराशाजनक खेळी केली परंतु त्याने 54 चेंडूत 62 धावा केल्या. 197 धावांचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेडची सर्वात वाईट सुरुवात झाली. फिलिप सॉल्ट आणि कर्णधार शादाब खान दोघेही गोलंदाजांना त्रास देण्यात अपयशी ठरले.

तथापि, अ‍ॅलेक्स हेल्सच्या 21 चेंडूत 46 धावा आणि इफ्तिखार अहमदच्या नाबाद 49, हुसेन तलतच्या 42 धावा आणि आसिफ अलीच्या नाबाद 21 धावांच्या शानदार योगदानामुळे इस्लामाबाद संघाने 19.1 ओव्हरमध्ये लक्ष गाठले आणि कराची किंग्सला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जाण्यास भाग पडले. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेमुळे दार 14 मार्चपर्यंत पीएसएलमध्ये अम्पायरिंग करू शकणार नाहीत. युएईमध्ये अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघात होणाऱ्या कसोटी सामन्यांत आयसीसी एलिट पॅनेल अंपायर कार्यरत असतील. पहिला कसोटी सामना 2 मार्चपासून अबू धाबी येथे तर दुसरा सामना 10 मार्चपासून त्याच ठिकाणी होणार आहे.