PSL 2020 Qualifier मॅचमध्ये इमरान ताहीरने घेतला अप्रतिम कॅच, विकेट घेतल्यावर ‘नवीन सेलिब्रेशन’ने नेटकरी चकित (Watch Video)
इमरान ताहिर (Photo Credits: Twitter)

इमरान ताहिरने (Imran Tahir) क्रिकेट मैदानावर नुकतंच आपल्या विकेट घेतल्यावर साजरा करण्याच्या उत्सवाने चाहत्यांना चकित केलं. पीएसएल (PSL) 2020 मध्ये मुलतान सुलतानकडून (Multan Sultan) खेळत असलेल्या ताहिरने मुल्तान कराची किंग्जविरुद्ध (Karachi Kings) क्वालिफायर सामन्यादरम्यान शरजील खानचा (Sharjeel Khan) झेल घेतल्यानंतर आपल्या चाहत्यांना आपल्या नवीन उत्सवाची झलक दिली. सुरुवातीला ताहिर घसरलेला दिसला, पण त्याने जमिनीवर पडतानाची पोज देण्यापूर्वी झेल पूर्ण केला. ट्विटर यूजर्स देखील 41 वर्षीय स्पिनरच्या नवीन सेलिब्रेशन पाहून प्रभावित झाले आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कराची किंग्जच्या डावाच्या चौथ्या षटकात ही घटना घडली. सोहेल तन्वीरच्या षटकातशार्जिल खानने चेंडूत थेट डीप मिड-विकेटच्या दिशेने मारला. सुरुवातीला ताहिरने झेल टिपण्यासाठी धाव घेतली तेव्हा झेल घेताना त्याचा तोल गेला आणि तो घसरला, पण त्याने चेंडू सोडला नाही आणि आपल्या नवीन विकेट सेलिब्रेशनने चाहत्यांना प्रभावित केले. (ZIM विरुद्ध वहाब रियाझने कोरोनाचा मोडला नियम, चेंडूवर लाळ लावल्यावर मैदानावर उडाला गोंधळ)

इमरान ताहिरने फॅन्सने त्याच्या नवीन सेलिब्रेशनची झलक दाखवली, पाहा...

तहरीने प्रथम झेल पूर्ण केला आणि त्यानंतरही जमिनीवरच, 41 वर्षीय फिरकीपटूने त्याच्या नवीन विकेट सेलिब्रेशनची झलक दाखवली. ट्विटर यूजर्सने ताहिरच्या पोझच्या मजेदार मिम्स त्वरित व्हायरल केले आणि त्याने दक्षिण आफ्रिकन खेळाडूच्या नवीन सेलिब्रेशनवर प्रतिक्रिया दिली.

रॉयल सेलिब्रेशन

चांगला झेल

इमरान ताहीर

ताहिरचे नवीन सेलिब्रेशन

कराची किंग्सने पीएसएल 2020च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि मुलतान संघाला 141 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात किंग्स देखील 20 ओव्हरमध्ये 141 धावाच करू शकले आणि सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कराची किंग्सने विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.