MI vs PBKS IPL 2021: पंजाब किंग्स संघासाठी ‘हे’ 3 खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर, मुंबई इंडियन्स संघाकडून हिसकावतील विजयाचा घास!
मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

PBKS vs MI IPL 2021 Match 17: आयपीएलच्या (IPL) 14व्या मोसमाची पंजाब किंग्जची  (Punjab Kings) सुरुवात काही अपेक्षेनुसार झाली नाही. गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाविरुद्ध पंजाब किंग्जसमोर कडू आव्हान आहे. फ्रँचायझीच्या नावातील बदल संघासाठी अद्याप प्रभावी ठरलेला नाही आणि त्यांना वर्षानुवर्षे चालत आलेली समस्या पुन्हा सतावत आहे. दर्जेदार अष्टपैलू आणि गोलंदाजांची कमतरता ज्यांना थोडी फलंदाजी करता येईल ही पंजाब किंग्जची मुख्य कमतरता आहे. मागील सामन्यात त्यांनी फॅबियन अ‍ॅलन आणि मोइसेस हेन्रिक्झला संधी दिली पण त्यांना पराभव टाळा आला नाही. निकोलस पूरन आणि क्रिस गेल यांना अद्याप साजेशा खेळ करता आला नाही तर मयंक अग्रवाल सकारात्मक खेळाडू ठरला आहे. अशास्थितीत पंजाब किंग्जचे 3 स्टार खेळाडू मुंबई इंडियन्सविरुद्ध गेम-चेंजर्स ठरू शकतात. (PBKS vs MI IPL 2021 Match 17: Chepauk वर आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची गाठ पंजाब किंग्सशी, अशी असेल दोंघाची संभावित प्लेइंग XI)

1. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)

मागील दोन सामन्यांत काही चांगली खेळी करून मयांक अग्रवालने आपले समर्थन करणाऱ्यांना योग्य सिद्ध केले आहे. हंगामाच्या पहिल्या दोन सामन्यात तो अपयशी ठरला होता, पण आता त्याचा फॉर्म संघासाठी सकारात्मक सिद्ध होत असून आता त्यांना दुसर्‍या फलंदाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मयंक लांब शॉट्स खेळू शकतो आणि कमी वेळात संघाला सामन्यात नियंत्रण मिळवून देऊ शकतो. केएल राहुल वेगळ्या भूमिकेत असल्याने अग्रवाल नक्कीच संघासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

2. दीपक हुड्डा (Deepak Hooda)

हुड्डाने हंगामाची धमाकेदार सुरुवात केली आणि रॉयल्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले पण त्यांनतर तो दोनदा 20 धावसंख्येचा आत बाद झाला. त्याला चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत बदलण्याची गरज आहे. अखेरच्या सामन्यात चार ओव्हर देखील फेकए आणि फक्त 22 धावा देत तो किफायतशीर होता. त्याने हंगामात बर्‍याच परिपक्वता दर्शवली आहे आणि आताच हंगाम तो स्वतःच्या नावावर करू शकतो. तो पंजाब किंग्जसाठी गेम चेंजर खेळाडू असेल.

3. मोहम्मद शमी (Mohammed Shami)

शमीने पंजाब किंग्जसाठी हवी तशी कामगिरी करता आलेली नाही आणि गोलंदाजी विभागाने कामगिरी करायचे असल्यास बरेच काही त्याच्यावर अवलंबून आहे. अर्शदीप सिंह पंजाबचा एक आघाडीचा गोलंदाज म्हणून समोर आहे आणि त्याला गोलंदाजी जोडीदार म्हणून मोहम्मद शमीकडून दुसर्‍या टोकाला चांगली कंपनी मिळू इच्छित आहे. त्याची गोलंदाजी अतिशय चांगली आहे जी जगातील कोणत्याही फलंदाजाला त्रास देऊ शकेल आणि पंजाब संघासाठी चांगली कामगिरी बजावण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.