PBKS vs MI IPL 2021 Match 17: Chepauk वर आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची गाठ पंजाब किंग्सशी, अशी असेल दोंघाची संभावित प्लेइंग XI
केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

MI vs PBKS IPL 2021: चेपॉकच्या (Chepauk) मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाचा त्यांचा अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज होत आहे. या सामन्यात गतविजेत्या संघापुढे पंजाब किंग्सचे (Punjab Kings) आव्हान असेल. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर धावा करण्यासाठी फलंदाजांना संयम आणि परिस्थितीची जुळवून घेण्याची गरज आहे. यंदा मुंबईने या मैदानावर यापूर्वी चार सामने खेळले आहेत त्यापैकी दोन सामने गमावले आहेत तर दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. मुंबईची मधली फळी संघर्ष करत असताना गोलंदाजांनी विशेषतः युवा राहुल चाहरने (Rahul Chahar) आपली छाप पडली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सचे गोलंदाज मात्र विकेटसाठी धडपडताना दिसत आहे. अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) हा आणखी एक युवा खेळाडू आहे जो आपल्या फ्रँचायझीसाठी बॉलसह उत्तम काम करत आहे. (IPL 2021: Hardik Pandya याच्यावर संतापला Irfan Pathan, ट्विट करून दिला मोलाचा सल्ला म्हणाला- ‘असे न केल्यास मुंबई इंडियन्सना होणार नुकसान’)

चेन्नईमध्ये होणाऱ्या आपल्या अखेरच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. म्हणजेच ते आपल्या नियमित विजयी संयोजनासह मैदानात उतरतील. क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मावर संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. यानंतर मधल्या फळीत-ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल आणि किरोन पोलार्ड यांच्यावर मोठी खेळीची संघाला अपेक्षा असेल विशेषतः हार्दिककडून तो तीनही सामन्यात अपयशी ठरला. जयंत यादवचे संघातील स्थान कायम राहील. तो एक अतिरिक्त फिरकीपटू म्हणून संघासाठी उपयोगी पडू शकतो. दुसरीकडे, पंजाब किंग्स देखील त्यांच्या संघात अधिक बदल करताना दिसत नाही पण ते चेन्नईची खेळपट्टी लक्षात घेता मुरुगन अश्विनच्या जागी रवी बिश्नोईला संधी देऊ शकतात, पण तसं होण्याची शक्यता कमी आहे. निकोलस पूरणचे असे एकमात्र संभाव्य स्थान आहे जिथे पंजाबकडे डेविड मालनच्या रूपात योग्य एक पर्याय उपलब्ध आहे.

पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हनः मयंक अग्रवाल, केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), क्रिस गेल, निकोलस पूरन/डेविड मलान, दीपक हुड्डा, शाहरुख खान, मोईस हेनरिक्स, फॅबियन अ‍ॅलन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, किरोन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.