PBKS vs DC IPL 2021 Match 29: दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय, मयंक अग्रवालकडे पंजाब संघाची कमान
किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

PBKS vs DC IPL 2021:  इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 29व्या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आमने-सामने येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब-दिल्ली संघात आजचा आयपीएल (IPL0 सामना रंगणार आहे. पंजाबसाठी आजच्या सामन्यात नियमित कर्णधार केएल राहुल (KL Rahul) उपस्थित नसल्यामुळे मयंक अग्रवालकडे (Mayank Agarwal) नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक अपेक्षित बदल झाला आहे. राहुलच्या जागी डेविड मलान (Dawid Malan) याला संधी दिली असून दिल्लीच्या विजयी संयोजनात कोणताही बदल झालेला नाही आहे. (PBKS vs DC IPL 2021 Match 29: DC विरुद्ध सामन्यापूर्वी पंजाब किंग्सला बसला मोठा फटका, कर्णधार KL Rahul रुग्णालयात दाखल)

पंजाबसाठी कर्णधार राहुल उपलब्ध नसल्यामुळे आता क्रिस गेल, मयंक अग्रवालकडे फलंदाजीची धुरा असणार आहे. मलानला निकोलस पूरच्या (Nicholas Pooran) जागी पंजाबकडून आयपीएल डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे तर राहुलच्या मयंकने संघात स्थान घेतले आहे. हरप्रीत ब्रारने मागील सामन्यात आपली योग्यता सिद्ध केली आहे तर अनुभवी मोहम्मद शमीने सात सामन्यांत आठ बळी मिळवून आपली भूमिका चोख बजावली आहे. पण झे रिचर्ड्सन आणि रीले मेरेडिथ गोलंदाजीने महागडे ठरले आहेत. दुसरीकडे, दिल्ली संघ सध्या संतुलित दिसत आहे. शिखर धवन-पृथ्वी शॉच्या जोडीवर दिल्लीच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. दोघे सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. शिवाय, स्टिव्ह स्मिथ व कर्णधार रिषभ पंत देखील नियमित योगदान देत आहेत. वेगवान गोलंदाजी विभागात त्यांच्याकडे आवेश खान, कगिसो रबाडा आणि इशांत शर्मासारखे त्रिकुट आहे.

पहा दिल्ली-पंजाबचा प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल (कॅप्टन), क्रिस गेल, प्रभसिमरन सिंग, डेविड मलान, दीपक हुड्डा, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, क्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कगिसो रबाडा आणि आवेश खान