शादाब खान (Photo Credit: Getty)

सोमवारी पाकिस्तानचे क्रिकेटपटू शादाब खान (Shadab Khan), हैदर अली (Haider Ali) आणि हारीस रौफ (Haris Rauf) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे समोर आले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाकिस्तान टीम इंग्लंड दौऱ्यावर (Pakisan Tour of England) जाणार आहे. त्यापूर्वी पीसीबीने तीन खेळाडूंची कोरोना चाचणी सकारात्मक असल्याचे जाहीर केले. इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 28 जून रोजी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचं वैद्यकीय पथक या तिन्ही खेळाडूंच्या संपर्कात असून खेळाडूंना क्वारंटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीसीबीने म्हटले आहे की, "पीसीबीचे वैद्यकीय पथक तिघांच्या संपर्कात आहे ज्यांना त्वरित स्वतः क्वारंटाइन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” “रामापिंडी येथे प्रदर्शित इमाद वसीम आणि उस्मान शिंवरी यांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे आणि ते 24 जून लाहोरला जातील,” असे या निवेदनात म्हटले आहे. (Coronavirus: बांग्लादेशी क्रिकेटपटू मशरफे मुर्तजाला कोरोनाची लागण, ढाका येथील घरात केलं क्वारंटाइन)

क्लीफ डिकन, शोएब मलिक आणि वकार युनूस यांना वगळता अन्य खेळाडू आणि संघाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (22 जून) कराची, लाहोर आणि पेशावर येथील आपापल्या केंद्रांवर टेस्ट घेण्यात आल्या आणि त्यांचा अहवाल मंगळवार, 23 जून पर्यंत अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होण्यापासून काही आठवडे दूर असल्याने हे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी धक्कादायक आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ही कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले होते. आफ्रिदीने स्वतः याची माहिती सोशल मीडियावरून माहिती दिली होती.

8 जुलै पासून यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज टीममध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. हे सर्व सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळले जातील आणि वेस्ट इंडिज संघ जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात इंग्लंड रवाना झाला होता. वेस्ट इंडिजनंतर यजमान आणि पाकिस्तानमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान 3 सामन्यांची टेस्ट आणि टी-20 मालिकाही खेळली जाईल. इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान बोर्डाने 29 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या संघात राखीव खेळाडू म्हणून आहेत.