IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी (IND vs ENG 3rd Test) सामना खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अप्रतिम कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक (Yashasvi Jaiswal Century) झळकावले. त्याने 104 धावा केल्या, पण रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र दुखापतग्रस्त होण्याआधी त्याने टीम इंडियाला (Team India) तिसऱ्या कसोटीत उत्कृष्ट स्थितीत आणले आहे. भारताकडे सध्या इंग्लंडविरुद्ध एकूण 346 धावांची आघाडी आहे. इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटनेही यशस्वी जैस्वालचे कौतुक करताना बरेच काही सांगितले आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 3rd Test Day 4 Live Streaming: चौथ्या दिवसाचा खेळाला लवकरच होणार सुरूवात, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)

बेन डकेट म्हणाला....

तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बेन डकेट म्हणाला की, जेव्हा तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंना असे खेळताना पाहतो तेव्हा असे वाटते की आपण थोडे श्रेय घेतले पाहिजे. ते आपल्या वेगळ्या शैलीत खेळत आहेत. सध्याच्या क्रिकेटमध्ये हे आपण अनेकदा पाहिले आहे. इतर खेळाडू आणि इतर संघ देखील त्या आक्रमक शैलीचे क्रिकेट खेळत आहेत हे पाहणे खूपच रोमांचक आहे. त्यांने यशस्वी जैस्वालचे कौतुक केले आणि सांगितले की तो उगवत्या सुपरस्टारसारखा दिसतो. तो सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

इंग्लंडसाठी शतक झळकावले

इंग्लंडच्या पहिल्या डावात 151 चेंडूत 23 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 153 धावा करणाऱ्या बेन डकेटने सांगितले की, भारतीय संघ शनिवारी अधिक चांगल्या योजना घेऊन मैदानात उतरला होता. तो एक दिवस होता जेव्हा मला वाटते की तुम्ही भारताला श्रेय दिले पाहिजे. सकाळच्या सत्रात तो सहज धावा काढण्याची संधी देत ​​नव्हता.

जैस्वालने केली उत्कृष्ट फलंदाजी

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने पहिल्यांदा सेटल होण्यासाठी वेळ मारून नेली. यानंतर, जेव्हा त्याची नजर पूर्णपणे क्रीजवर स्थिर झाली तेव्हा त्याने स्फोटक पद्धतीने फलंदाजी केली. जैस्वालने पहिल्या 35 धावा करण्यासाठी 73 चेंडू घेतले. यानंतर पुढील 65 धावा करण्यासाठी त्याने केवळ 49 चेंडू खेळले. त्याने 122 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र अखेरच्या सत्रात दुखापतग्रस्त होऊन तो निवृत्त झाला. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.