Opening Ceremony (Photo Credit - Twitter)

आयसीसी विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) साठी एकही उद्घाटन सोहळा नसल्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. पण आता असे दिसते आहे की 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी चाहत्यांना विश्वचषक उद्घाटन सोहळा (Opening Ceremony) पाहायला मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये चाहत्यांसाठी एका संगीत सोहळ्याचे आयोजन करणार आहे. या वेळी लाइट शो आणि डान्स परफॉर्मन्स असेल, मात्र या कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र गायक अरिजित सिंग असेल. या उद्घाटन सोहळ्यासाठी विश्वचषकाचे सुवर्ण तिकीटधारक, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अभिनेते रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

वृत्तानुसार, 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी एक संगीत सोहळा होणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी सांगितले की, गोल्डन तिकीटधारक हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. (हे देखील वाचा: Shubman Gill Health Update: क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी! शुभमन गिल अहमदाबादसाठी रवाना, IND vs PAK सामन्यात होऊ शकतो एंट्री)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट स्पर्धा हा जगभरातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेटच्या मैदानावर या दोन संघांमधील संघर्ष साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतो. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा आहे आणि या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सातही विश्वचषक सामने भारताने जिंकले आहेत. भारताने त्यांच्या विश्वचषक 2023 च्या मोहिमेला ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय मिळवून सुरुवात केली, तर पाकिस्ताननेही त्यांच्या पहिल्या दोन सामन्यात नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव करून शानदार सुरुवात केली.