One Chahar Down! टीम इंडियाच्या 'या' चाहर ने गुपचूप केला साखरपुडा, पाहा हे Photos आणि Videos
राहुल चाहर, दीपक चाहर (Photo Credit: Getty/Instagram)

भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू मागील काही काळापासून एकामागून एक आपल्या आयुष्यातील दुसरा डाव सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची मोस्ट एलिजिबल बॅचलरच्या यादीत गणना केली जात होती, परंतु गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघातीळ खेळाडूं लग्न किंवा साखरपुडा करण्यापासून वारंवार व्यस्त असल्याचे दिसत आहेत. यात आता अजून एका नावाची भर पडली आहे. या यादीत आणखी एक युवा भारतीय क्रिकेटपटूचे नाव यात सामील झाले आहे. होय… भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) युवा प्रतिभावान फिरकी गोलंदाज राहुल चाहर (Rahul Chahar) याचा गुरुवारी साखरपुडा सोहळा पार पडला. राजस्थानचा 20 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज आता आपल्या जीवनाची नवी खेळी सुरू करणार आहे.

आपला भाऊ आणि टीम इंडियाच्या मर्यादित षटकारांचा प्रसिद्ध गोलंदाज दीपक चाहर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत राहुलचा साखरपुडा पार पडला. दीपकने सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर या सोहळ्याचे फोटो शेअर केले आणि सर्वांना चकित केले. भाऊ दीपक वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका संपल्यानंतर बुधवारी दाखल झाला. आपल्या भावाच्या साखरपुड्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. दीपकने लिहिले, "तो त्या भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहे ज्याला त्याच्या खेळीच्या सुरुवातीसच त्याचे प्रेम मिळाले, राहुल तुझ्यासाठी खूप आनंदी आहे."

चहार कुटुंबात आणखी एक भर

इशानीचे चहार कुटुंबात स्वागत

राजस्थानचा युवा फिरकी गोलंदाज राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पण, त्याला मागील दोन्ही मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही.  दुसरीकडे, त्याचा भाऊ दीपकने भारतीय टी-20 संघात स्थान निश्चित केले आहे. दीपक सातत्याने चांगली कामगिरी करत संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज बनला आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत राहुलकडे टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे.