SRH vs MI IPL 2024: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना ठरला आयपीएलचा ऐतिहासिक सामना, मोडले गेले 'हे' पाच महत्त्वाचे विक्रम
SRH (Photo Credit - X)

SRH vs MI, IPL 2024 8th Match: सनरायझर्स हैदराबादने उच्च धावसंख्येच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला (SRH Beat MI) आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सकडून कडवी झुंज देण्यात आली. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सने शेवटच्या षटकांपर्यंत जिंकण्याची इच्छाशक्ती दाखवली पण 20 षटकांत 5 गडी गमावून 246 धावा करता आल्या. आयपीएलमधील ही मुंबईची सर्वोच्च धावसंख्या आहे. मुंबई इंडियन्सकडून तिळक वर्माने सर्वाधिक 64 धावा केल्या. या सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक षटकार (38) मारण्याचा विक्रमही मोडला गेला.

याला प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सने स्फोटक सुरुवात केली. मात्र, चौथ्या षटकात इशान किशनच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. ईशान 34 धावा करून बाद झाला. रोहित शर्माने 12 चेंडूत 26 धावा केल्या. नमनने 14 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. तिळक वर्माने 34 चेंडूत 64 धावांची दमदार खेळी करत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने 20 चेंडूत 24 धावा केल्या. टीम डेव्हिडने 22 चेंडूत 42 धावांची खेळी केली. रोमारियो शेफर्डने 15 धावांचे योगदान दिले. (हे देखील वाचा: Sunrisers Hyderabad New Record: हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली, आरसीबीचा 263 धावांचा विक्रम मोडला)

आज जे विक्रम मोडले गेले

  • एकूण 38 षटकार मारले जे एक मोठा विक्रम आहे
  • एका सामन्यात एकूण झाल्या 523 धावा
  • अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत झळकावले सर्वात वेगवान अर्धशतक
  • आयपीएलच्या पहिल्या 10 षटकात सर्वाधिक 148 धावा
  • हैदराबादने 14.4 षटकात केल्या सर्वात वेगवान 200 धावा
  • ज्यामध्ये हैदराबादने आतापर्यंत सर्वाधिक 277 धावा केल्या आहेत