Mumbai Team (Photo: @Sportskeeda)

Mumbai Cricket Team vs Madhya Pradesh Cricket Team:  बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात . प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशने 20 षटकांत 8 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईने सूर्यकुमार यादव आणि रहाणे यांच्या दमदार खेळीमुळे 13 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. (हेही वाचा -  MUM vs MP SMAT Final Live: सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचे मुंबई समोर 175 धावांचे आव्हान, रजत पाटीदारची 81 धावांची शानदार खेळी)

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 15 धावांवर पहिला धक्का बसला. पृथ्वी शॉ 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने 9 चेंडूत 16 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले. शिवम दुबेने 9 धावा केल्या. सूर्यकमार यादवने 35 चेंडूत 48 धावांची खेळी खेळली. अथर्व 16 आणि सूर्यांश 36 धावा करून नाबाद माघारी परतला.

कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या उपांत्य फेरीत बडोद्याला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती, तर मध्य प्रदेशने दिल्लीचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या मध्य प्रदेशला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. अर्पितला केवळ तीन धावा करता आल्या. हर्षने दोन तर हरप्रीतने १५ धावांची खेळी खेळली. सेनापतीने 23 चेंडूत 15 धावा केल्या. व्यंकटेश अय्यर १७ धावा करून बाद झाला तर राहुल १९ धावा करून बाद झाला. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अथर्व अंकोलेकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेगडे यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. रजत पाटीदारने 40 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 174 धावा केल्या होत्या.