Photo Credit - BCCI X Account

MUM vs MP SMAT Final Live:  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या उपांत्य फेरीत बडोद्याला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती, तर मध्य प्रदेशने दिल्लीचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ दुस-यांदा विजेतेपद पटकावण्याकडे डोळे लावून बसेल, तर मध्य प्रदेश संघाला प्रथमच ट्रॉफी जिंकण्याची इच्छा असेल.  (हेही वाचा -  Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत घेतल्या 5 विकेट; मोडला कपिल देवचा विक्रम)

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मध्य प्रदेशची सुरुवात चांगली झाली नाही शार्दुल ठाकूरने त्यांना सुरुवातीलाचा दोन धक्के दिले. यानंतर शुभांशू सेनापती (17 चेंडूत 23 धावा) आणि हरप्रित सिंगने (23 चेंडूत 15 धावा) डाव संभाळला. यानंतर फंलदाजीला आलेल्या रजत पाटीदार मध्य  प्रदेशच्या डावाला खऱ्या अर्थाने आकार दिला. पाटीदारने 6 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 40 चेंडूत 81 धावा केल्या.  त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने 20 षटकांत 174 धावा केल्या.

पाहा पोस्ट -

दरम्यान 175 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाची सुरूवात सावध झाली मात्र दुसऱ्या षटकात मुंबईला पहिला धक्का बसला पृथ्वी शॉ लवकर बाद झाला. सध्या मुंबईची धावसंख्या ही 4.4 षटकांनंतर 47 झाली असून अजिंक्य रहाणे हा 14 चेंडू खेळून 20 धावांवर खेळत असून 8 चेंडूत  धावाकरून खेळत आहे.