माजी भारतीय कर्णधार, महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय भविष्य सध्या माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. मागील विश्वचषक स्पर्धेत माजी कर्णधार धोनीने गेल्या जुलैमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या 2019 वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. आयपीएलमधून (IPL) तो क्रिकेटच्या मैदानावर परतणार होता, पण 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. शिवाय, याच्या आयोजनावरही संकट उभे आहे. धोनीने त्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि भारताला फायनलमध्ये पोहचवले असे दिसत असताना तो मार्टिन गप्टिलच्या चेंडूवर रनआऊट झाला. तेव्हापासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय भवितव्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. भारताचे माजी सलामी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीने आगामी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) भाग घ्यावा असे त्यांचे मत आहे, मात्र त्यांनी म्हटले की असे होणे आता शक्य नाही. (भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर ने केले एमएस धोनीचे समर्थन, म्हणाला फिट असल्यास टीम इंडियामध्ये समावेश होणे आवश्यक)
गावस्कर दैनिक जागरणला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, "महेंद्र सिंह धोनीने टी-20 विश्वचषक खेळावा अशी माझी नक्की इच्छा आहे, परंतु हे होणे खूप अवघड आहे. संघ आता धोनीच्या पुढे गेला आहे. तो मोठी घोषणा करणारा व्यक्ती नाही. माझ्या मते आता तो शांततेत क्रिकेटला निरोप देईल." धोनीचा भारताच्या टी-20 विश्वचषक संघात समावेश होईल की नाही याबद्दल बर्याच प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सांगितले होते की, आयपीएलची चमकदार मोहीम राबविल्यावरच 38 वर्षीय धोनीला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू शकेल.
धोनी चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) प्री-हंगाम शिबिरात नेट्समध्ये खूप मेहनत घेतली आहे, परंतु कोविड-19 मुळे आता स्पर्धा होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे, आता त्याला ओळख पटवून देण्याची संधी मिळणार का हे पाहणे बाकी आहे.