
भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (World Cup Final) श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने पुन्हा टॉस करण्याच्या विषयावर मौन सोडले. भारतविरूद्ध झालेल्या टॉस दरम्यान कसा गोंधळ झाला आणि टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या आग्रहानंतर पुन्हा नाणेफेक झाली याचा संगकाराने खुलासा केला. 2 एप्रिल 2011 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर ठरला, कारण या दिवशी धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दुसर्यांदा वनडे विश्वचषक जिंकला. हा सामना बर्यापैकी रोमांचक होता, पण सामना सुरू होण्याच्या अगोदर टॉस दरम्यान एक मोठा वादंग निर्माण झाला होता. हा सामन्यात दोनदा टॉस झाला जे सामान्यत: होत नाही. वानखेडे स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षक जोरदार गोंधळ घालत असल्यामुळे संगकारा म्हणाला की धोनी माझा आवाज ऐकू शकला नाही. रविचंद्रन अश्विनने होस्ट केलेल्या इंस्टाग्राम मालिकेच्या 'रेमिनिस विथ अॅश' या मालिकेच्या नवीन एपिसोड दरम्यान संगकाराने ही कधीही न ऐकलेला किस्सा सांगितला. (एमएस धोनी याला बिर्याणी खाऊ न घालणे मोहम्मद कैफ याला पडले महागात? माजी भारतीय फलंदाजाने सुनावला रंजक प्रसंग)
"गर्दी प्रचंड होती. श्रीलंकेत असे कधीच होत नाही. एकदा माझ्या बरोबर हे ईडन गार्डन्समध्ये झाले होते जेव्हा मी पहिल्या स्लिपवरील व्यक्तीशी बोलू शकत नव्हतो आणि नंतर वानखेडे येथे बोलणे शक्य नव्हते. माहीने नाणे फेकले आणि मी माझा कॉल दिला. त्यानंतर मी काय बोललो याची धोनीला पूर्ण खात्री नव्हती. त्याने मला विचारले की तुम्ही टेल्स सांगितले. मी धोनीला उत्तर दिले नाही मी त्याला हेड्स म्हटले. यानंतर मॅच रेफरीनेही सांगितले की मी टॉस जिंकला. मग धोनी म्हणाला, नाही… नाही… तू असं म्हणाला नाहीस, इथे काही गोंधळ आहे. मग माही म्हणाला की चला आणखी एक वेळ नाणेफेक करू आणि त्यानंतर ते पुन्हा टॉस केला," संगकारा म्हणाला.
तो म्हणाला की, "माहीने नाणेफेक जिंकला असता तर त्याने प्रथम फलंदाजी केली असती आणि नंतर कथा वेगळी असती. हे माझे नशीबच होते की मी नाणेफेक जिंकली जर धोनीने नाणेफेक जिंकला तर भारत प्रथम फलंदाजी केली असती आणि आम्ही पाठलाग केला असता." वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकूनही श्रीलंकेचा पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकाने अखेरीस 1996 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते.