भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मैदानात एक अतिशय शांत आणि गंभीर खेळाडू म्हणून पाहिला जातो. परंतु मैदानाबाहेर आपल्या कडक टिप्पण्यांसाठीही तो तितक्याच चर्चेत राहतो. सध्या धोनीच्या निवृत्तीच्या जोरात आहे, पण याने त्याला काही फरक पडतो असे दिसत नाही. याचंच एक उदाहरण म्हणजे, जेव्हा त्याला चेन्नईतील एका कार्यक्रमात लग्नाशी संबंधित प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने प्रत्येकाचे मन जिंकण्यासारखे उत्तर दिले. धोनी म्हणतो की तो आदर्श नवऱ्यापेक्षा चांगला पती आहे आणि याचे कारण म्हणजे की तो त्याची पत्नी साक्षीला (Sakshi) जे करायचं आहे ते करू देतो. तो म्हणतो की तो आपल्या पत्नीच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो आणि यामुळे ती आनंदी असते. मंगळवारी चेन्नई येथे लग्नासाठी जोडीदारासाठी शोधत असलेल्या एका वेबसाइटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याने या गोष्टी बोलल्या. (Partner In Crime' सोबत विराट कोहली याचा फोटो, ओळखा पाहू कोण? म्हणताच Netizens कडून मिळाली स्पष्ट उत्तरं)
कार्यक्रमादरम्यान लग्नाबद्दल बोलताना धोनीने पहिले प्रत्येकाला आपल्या उत्तरासह हसण्यास भाग पाडले आणि नंतर आपल्या आयुष्यातील साक्षीचे महत्त्व सांगून सर्वांची मनं जिंकली. धोनी म्हणाला, "लग्नाआधी सर्व पुरुष सिंहासारखे असतात, पण लग्नाचा खरा अर्थ फक्त 55 वर्षांचा झाल्यावरच कळेल. मी माझ्या बायकोला ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करु देतो. कारण जर माझी पत्नी सुखी असेल तर मीसुद्धा आनंदी होईल." धोनी आणि साक्षी 2010 मध्ये विवाह बंधनात अडकले. धोनीच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हीही पाहा:
.@msdhoni’s at his hilarious best during an event in Chennai.@SaakshiSRawat check this out!😂🤣
PS, we agree with him, he is definitely ideal and the best husband.#Dhoni #MSDhoni #MahiWay pic.twitter.com/Bc2TYqhr5y
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) November 25, 2019
यावर्षी जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकनंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यादरम्यान धोनीचा खराब फॉर्म चांगलाच चर्चेत राहिला. आणि त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही जोर धरू लागल्या. सध्या धोनीच्या निवृत्तीवरचे चित्र पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलनंतर स्पष्ट होईल असे म्हटले जात आहे.