#MissYouYuvi: 'सिक्सर किंग' युवराज सिंह याच्या निवृत्तीच्या एका वर्षानिमित्त सोशल मीडियावर यूजर्स भावुक, पाहा Tweets
'सिक्सर किंग' युवराज सिंह (Photo Credits: Getty)

10 जून, हा दिवस भारतीय चाहत्यांसाठी एकीकडे आनंदायी ठरला तर काहीसा दुःखाचाही म्हणावा लागेल. एकीकडे 34 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदा लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवला तर, मागील वर्षी आजच्याच दिवशी भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह (Yuvraj Singh) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. भारतीय संघात (Indian Team) मधल्याफळीत फलंदाजी करणाऱ्या युवीने टीमला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. भारताच्या 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजयात युवीने टीमसाठी महत्वाची भूमिका बजावली होती. युवीच्या निवृत्तीच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं #MissYouYuvi सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागले. 2011 नंतर कॅन्सरवर मात करून क्रिकेटच्या मैदानावर परतलेल्या युवीला कामगिरीत सातत्य कायम ठेवता आहे नाही. 2017 मध्ये त्याने अखेरचा टी-20 आणि वनडे सामना खेळला. आणि नंतर आजच्या दिवशी मागील वर्षी वर्ल्ड कप दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (युवराज सिंह याने 'त्या' विधानाबद्दल मागितली माफी, युजवेंद्र चहलबद्दल आक्षेपार्ह विधानाबद्दल पोलिसांत केली होती तक्रार)

आजच्या दिवसाचे औचित्य साधून चाहत्यांनी #MissYouYuvi हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड केले आणि युवीने केवळ क्रिकेटच नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील त्यांना कसे प्रेरित केले यावर त्यांनी ट्विट पोस्ट केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानें केलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे चाहतेसुद्धा त्याला सहज विसरणार नाहीत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

महापुरुष कधीच सेवानिवृत्त होत नाहीत

एक वर्ष झालं...

#MissYouYuvi

क्रिकेट आणि आयुष्यात दोन्हीमध्ये प्रेरणादायी

युवराजने 2000 मध्ये केनियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या एक वर्षानंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात डेब्यू केले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज भावुक झाल्याचा झाला होता. युवी म्हणाला, “निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला”