अनुभवी वेगवान गोलंदाज माइकल होल्डिंग (Michael Holding) यांनी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत माल्कम मार्शल आणि अँडी रॉबर्ट्स, ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली (Dennis Lillee)आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन (Dale Steyn) यांचा समावेश केला आहे. मागील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टेनला पाहण्यासाठी पैसे खर्च करण्यास तयार असल्याचे 66 वर्षीय माजी क्रिकेटपटूने स्कायस्पोर्ट्स पॉडकास्टला सांगितले. माइकल यांनी कारकीर्दीत 60 कसोटी सामन्यांमध्ये 23.68 च्या सरासरीने 249 गडी बाद केले आहेत. होल्डिंग म्हणाले की, "माझे तिन्ही (मार्शल, रॉबर्ट्स आणि लिली) यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव आहे परंतु मी फक्त स्टेनला खेळताना पाहिले आणि आपण त्याला फोटोतून काढून टाकू शकत नाही. तो एका काळाचा उत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याला खेळताना पाहण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता." (विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या तुलनेवर जहीर अब्बास यांचे मोठे विधान, सर्व फॉर्मेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून 'या' क्रिकेटरची केली निवड)
स्टेनने आपल्या कारकीर्दीत 22.95 च्या सरासरीने 439 बळी घेतले. शिवाय, होल्डिंगने लिलीला परिपूर्ण गोलंदाज म्हणून संबोधले आहेत. "लिलीकडे लय, आक्रमकता, नियंत्रण होते. सुरुवातीला तो खूप वेगवान होता पण पाठीच्या दुखापतीनंतर त्याला आपली कृती पूर्णपणे बदलावी लागली आणि फलंदाजांना बाद करण्यासाठी त्याला वेगवेगळे मार्ग शोधावे लागायचे." आपल्या जोडीदाराच्या मार्शलविषयी बोलताना होल्डिंग म्हणाले, "मालकॉमने चांगली लय देऊन सुरुवात केली पण काळानुसार त्याला वेगवान गोलंदाजीबद्दल बरेच काही शिकले. तो फलंदाजांचे मूल्यांकन फार जलद आणि सहजतेने करायचे."
रॉबर्ट्स बद्दल तो म्हणाले की, "मी अँडी कडून खूप शिकलो. माझ्या कारकीर्दीत तो बहुतेक खोलीत माझा साथीदार होता आणि आम्ही दररोज रात्री क्रिकेटवर बरीच चर्चा करायचो. बर्याच वेळा आम्ही आमच्या खोलीत जेवण मागवायचो आणि क्रिकेटविषयी चर्चा करायचो. त्याला क्रिकेट किती माहित होतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही."