MI Vs KXIP, IPL 2019, Online Streaming: सनरायजर्स हैदराबाद संघाला यशस्वी टक्कर दिल्यानंतर किंग्ज इलेवन पंजाब (Kings XI Punjab) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2012) च्या 12व्या पर्वातील आपला पुढचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध खेळते आहे. हा सामना मुंबई (Mumbai) येथील वानखेडे स्टेडियम येथे होत आहे. पंजाबने आपले या आधी आयपीएल पर्वात 3 सामने खेळले आहेत आणि जिंकलेही आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स ने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबने सोमवारी हैदराबद संघाला धुळ चारल्याने गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे. तर, मुंबईचे गुणतक्त्यातील स्थान पाचव्या क्रमांकावर आहे. घरच्या मैदानावरच सामना असल्यामुळे मुंबईसाठी आज विजयाच्या अनेक संधी असल्याची चर्चा आहे. आज (बुधवार, 10 एप्रिल 2019) मुंबई इंडिन्स विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाब हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाब नाणेफेक
The @mipaltan win the toss and elect to bowl first against @lionsdenkxip #MIvKXIP pic.twitter.com/3yFv6Sf1NY
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2019
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाब हा सामना आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता. तसेच, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आपण Hotstar पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी Hotstar येथे क्लिक करा.
संभाव्य संघ
पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, क्रिस गेल, अँड्रयू टाई, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, मोइसिस हेनरिक्स, निकोलस पूरन, वरुण चक्रवर्ती, सॅम कुरेन, मोहम्मद शमी, सरफराज खान, हरडस विजोएन, अर्शदीप सिंह, दर्शन नालकंडे, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बराड आणि मुरुगन अश्विन.
मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चाहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मैक्लेनेघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह.