MI vs DC, IPL 2020 Final: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली कॅपिटल्स करणार पहिले फलंदाजी; फायनलसाठी असा आहे दोन्ही संघांचा Playing XI
आयपीएल 2020 ट्रॉफी (Photo Credit: Instagram/iplt20)

MI vs DC, IPL 2020 Final: चार वेळा आयपील विजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पहिल्यांदा फायनल गाठणारे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या अंतिम सामन्यात रंजक लढत होणार आहे. आजच्या सामन्यात मुंबई पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावत की दिल्ली पहिल्याच फायनलमध्ये बाजी मारतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आजच्या सामन्यात अनुभवी रोहित शर्मा मुंबईचे तर युवा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिल्लीचे नेतृत्व करताना दिसतील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात डीसी (DC) कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी दिल्लीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. मुंबईने राहुल चाहरच्या जागी जयंत यादवचा समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वात विक्रमी चार आयपीएल विजेतेपद जिंकले आहे, तर दिल्लीने पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. (IPL 2020 Final Satta Bazar Predictions: आयपीएल पर्वातील अंतिम सामन्यासाठी सट्टा बजारात तेजी, MI vs DC साठी अधिक बोली लावताना तीव्र स्पर्धा)

आजच्या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीकडून मुंबईला दमदार सुरुवातीची गरज असेल. रोहित यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करू शकला नसल्याने आजच्या अंतिम सामन्यात तरी तो प्रभावी कामगिरी करू पाहत असेल. सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या यांच्याकडून देखील संघाला मोठा डाव खेळण्याची अपेक्षा असेल. गोलंदाजी विभागात मुंबई जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर चांगल्या सुरुवातीला अवलंबून असेल. राहुल चाहर आणि कृणाल पांड्या मधल्या फलित दिल्लीच्या धावगातील वेसण घालू पाहत असतील. दुसरीकडे, दिल्लीसाठी दुसऱ्यांदा मार्कस स्टोइनिस डावाची सुरुवात करेल. स्टोइनिसने शिखर धवनसोबत मागील सामन्यात संघाला दमदार सुरुवात करून दिली होती आणि यंदा देखील त्यांच्याकडून घातक फलंदाजीची अपेक्षा असेल. कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांच्याकडे मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी असेल.

पाहा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, नॅथन कोल्टर-नाईल, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), मार्कस स्टोइनिस, शिखर धवन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, प्रवीण दुबे.