आंतरराष्ट्रीय महिला T-20 लीगमध्ये कमी धावांचा रेकॉर्ड, मालीचा संपूर्ण संघ झाला 6 धावांवर बाद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जर तुम्हाला कोणी सांगितले की एक क्रिकेट संघ केवळ 6 धावा करून बाद झाला, तर तुम्ही विश्वास ठेवाल? नाही, पण हे असं चक्क घडलाय आणि दुसरीकडे नव्हे तर महिलांच्या T-20 लीगमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर कोणाही संघाने अशी लाजिरवाणी कामगिरी केली नसेल.

आंतरराष्ट्रीय महिला T-20 क्रिकेट लीगमध्ये सामना रवांडा येथील किगाली येथे झालेल्या लीग मध्ये माली (Mali) विरुद्ध रवांडा (Rwanda) या दोन संघांच्या सामन्यादरम्यान हा प्रसंग घडला आहे. या सामन्यात एकही खेळाडूला शून्याचा आकडा ओलांडता आला नाही पर्यायी माली संघाचे सर्व फलंदाज केवळ 6 धावांवर बाद झाले. आश्चर्य म्हणजे फक्त एका खेळाडूने 1 धावा केल्या आणि 5 धावा एक्स्ट्रा म्हणून मिळाल्या. यामुळे T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड बनवण्यात आला आहे.

दरम्यान, याचवर्षी जानेवारीमध्ये झालेल्या एका सामन्यात चीन (China) चा संघ यूएई (UAE) विरुद्ध केवळ 14 धावांत बाद झाला होता. पण आता माळीच्या महिला संघाने सर्वात कमी धावसंख्येचा नवीन रेकॉर्ड बनवला आहे. 6 धावांचा पाठलाग करताना रवांडा संघानं केवळ 4 चेंडूत हे आव्हान पूर्ण केले.