अंडर-19 विश्वचषक (World Cup) शुक्रवारपासून सुरु झाला आहे. यात 16 संघ 48 सामने खेळतील. गतविजेता भारतीय संघ (Indian Team) आज श्रीलंका (Sri Lanka) अंडर-19 संघाविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. गतविजेत्या भारताला पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे, त्यांना सर्वांच्या अपेक्षापूर्ती करत जोरदार कामगिरी करावी लागणार आहे. भारताने आजवर सर्वाधिक 4 वेळा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. ग्रुप अ मध्ये भारताचा समावेश आहे ज्यात जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून पराभूत केले होते. भारतीय संघ विश्वचषकच्या मोहिमेची सुरुवात शेजारील देश श्रीलंकाविरुद्ध करेल. दोन्ही संघहच पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल. या स्पर्धेत खेळला जाणारा हा सातवा सामना आहे. (ICC U19 World Cup 2020 India Schedule: भारत अंडर-19 संघाचे संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि सामन्यांचे ठिकाण, जाणून घ्या)
आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक सामना दुपारी दीड वाजता माणगॉंग ओव्हल, ब्लोएमफोंटेन मध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये यशस्वी जयस्वाल हा एक उल्लेखनीय चेहरा आहे. घरगुती क्रिकेटमध्ये यशस्वीने चांगली कामगिरी केली असून त्याआधी त्याने अंडर-19 संघासाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यशस्वी ही संघाची फलंदाजीची धुरा सांभाळेल आणि या विश्वचषकमध्ये त्याच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. फलंदाजीमध्ये त्याला पाठिंबा देण्यासाठी कर्णधार प्रियम, टिळक वर्मा, ध्रुव चंद जुरेल आहेत. दिव्यांश सक्सेना यानेही मागील सामन्यांत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. गोलंदाजीत शुभम हेगडे आणि कार्तिक त्यागी यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. श्रीलंकेच्या फलंदाजीबद्दल बोलले तर नवोड परनाविठाणे, निपुण धनंजय हे मुख्य फलंदाज असतील. गोलंदाजीत कविंदू नाडीशन आणि अमीषा डी सिल्वा यांनी अलीकडेच चांगली कामगिरी केली आहे.
असा आहे भारत-श्रीलंका अंडर-19 संघ
भारत अंडर-19 संघ: प्रियम गर्ग (कॅप्टन), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवि बिश्वनोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलकर, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटिल.
श्रीलंका अंडर-19 संघ: निपुन धनंजय (कॅप्टन), नावोद पारानाविथाना, कामिल मिश्रा, अहान विक्रमासिंघे, सोनल दिनुशा, रविंडु राशांथा, मोहम्मद शामाज, तावीशा अभिषेक, एम.ए चामिंडु, विजेसिंघे, एशन डेनियल, दिलुम सुदीरा, काविंदु नादीशान, एल.एम दिलशान, मादुशनका, माथिशा पाथिराना, आमशी डी सिल्वा.