File picture of ICC U19CWC trophy. (Photo Credits: Getty Images)

गतविजेला भारतीय संघ (Indian Team) 19 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत 5 व्यांदा अंडर-19 विश्वचषक (World Cup) स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने मोहिमेची सुरुवात करेल. यापूर्वी चार वेळा अंडर 19 विश्वचषक स्पर्धा चार वेळा जिंकून भारत सर्वात यशस्वी संघ बनला आहे. सध्या भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारताने यापूर्वी ही विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. रिषभ पंत, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांसारख्या खेळाडूंनी अंडर-19 विश्वचषकमधून नवलोकाला येत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. यावर्षीही विश्वचषकात भारतीय अंडर-19 संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघात उत्कृष्ट युवा खेळाडू आहेत आणि हे खेळाडू पुन्हा एकदा ही स्पर्धा भारताला जिंकण्यास सक्षम आहेत. प्रियाम गर्ग (Priyam Garg) या युवा भारतीय खेळाडूंचे नेतृत्व करेल. (U19 World Cup 2020 Time Table: दक्षिण आफ्रिकामध्ये रंगणार अंडर-19 विश्वचषक स्पर्धा, सर्व सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)

यंदा आयसीसी (ICC) अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत (South Africa) खेळला जात आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 17 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान संघांमध्ये होणार आहे. 50 ओव्हरच्या या स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. भारत अंडर-19 संघाने सप्टेंबरमध्ये 19 वर्षांखालील आशिया चषक जिंकला आणि इंग्लंड आणि बांग्लादेशसह इंग्लंडच्या भूमीवर खेळवण्यात आलेली तिरंगी स्पर्धाही जिंकली.

असे आहे भारताच्या अंडर-19 सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक

19 जानेवारी, इंडिया अंडर-19 विरुद्ध श्रीलंका अंडर-19, माणगॉंग ओव्हल, ब्लोएमफोंटेन (दुपारी 1.30 वाजता)

21 जानेवारी, इंडिया अंडर-19 विरुद्ध जपान अंडर-19, माणगॉंग ओव्हल, ब्लोएमफोंटेन (दुपारी 1.30 वाजता)

24 जानेवारी, इंडिया अंडर-19 विरुद्ध न्यूझीलंड अंडर-19, माणंग ओव्हल, ब्लोमफोंटेन (दुपारी 1.30 वाजता)

3 फेब्रुवारी, फायनल, सेनवेस पार्क, पॉचेफस्टरूम

भारत अंडर-19 संघ: प्रियम गर्ग (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार), शाश्वत रावत, सिद्धेश वीर, शुभंग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अकोलेकर, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.